DC vs RCB : कमाल झाली, सूयश शर्माचा कहर, 24 पैकी 20 डॉट बॉल, पहिल्यांदाच असं घडलं
क्रिकेट चाहत्यांना सोमवारी 27 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 39 व्या सामन्यात इतिहासातील चेंडूंबाबत दुसरा सर्वात मोठा विजय पाहायला मिळाला. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 76 धावांचं आव्हान 81 बॉलआधी पूर्ण केलं. आरसीबी यासह सर्वाधिक चेंडू राखून सामना जिंकणारी दुसरी टीम ठरली. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या आरसीबीच्या 2…