8 हजार विद्यार्थ्यांना नवा रोजगार, टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी अन् ITI मध्ये मोठा करार; 45 अत्याधुनिक प्रयोगशाळा होणार
Mumbai: राज्यातील तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे म्हणून कौशल्य विकास विभागानं मोठी घोषणा केली आहे. मंत्रालयात आज कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आलाय. या कराराअंतर्गत कंपनी राज्यातील 45 आयटीआय संस्थांमध्ये हलक्या वाहन तंत्रज्ञ (LMV) अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार आहे. प्रयोगशाळांसोबत…