‘चिरैया’मधल्या विचलित करणाऱ्या ब्लेडच्या सीनविषयी अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला “तिने दार उघडलं..”
‘चिरैया’ ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. ‘मॅरिटल रेप’ अर्थात वैवाहिक बलात्कारसारख्या गंभीर विषयावर या सीरिजमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. या सीरिजमधल्या एका सीनने प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणला. हा सीन पूजा आणि अरुण यांच्यातील आहे. हे दोघं मनालीला जातात. तिथे अशी काही घटना घडते जिचा विचार करूनही अंगावर काटा येतो. या…