TET Exam: ‘टीईटी’ पेपरफुटीप्रकरणात मोठा झटका; आरोपींना थेट मकोकाचा दणका, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
दादा भुसे, टीईटी परीक्षा , मकोका कारवाई Image Credit source: एजन्सी TET Exam MCOCA : टीईटी पेपरफुटीमुळे राज्य सरकार आणि शिक्षण खाते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. NEET परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीने विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष असतानाच शिक्षकांच्या पात्रता परीक्षेसाठीची प्रश्नपत्रिकाही फुटली. राजकारणात फोडाफोडी सुरू असतानाच शिक्षण खात्याला ही फुटीची कीड लागल्याने जनतेत मोठा रोष निर्माण झाला…