Headlines

Uday Samant | पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शिंदे गटाचा प्रतिसाद; मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!

Uday Samant | पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शिंदे गटाचा प्रतिसाद; मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
Uday Samant | पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शिंदे गटाचा प्रतिसाद; मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!


मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, सोन्याची खरेदी मर्यादित ठेवणे आणि परदेश दौरे टाळण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना नेते आणि राज्यातील मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले की, “मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इलेक्ट्रिक कारचा वापर करत आहेत. “मी स्वतः मुंबई परिसरात ईव्ही गाडी वापरत आहे. सुरक्षिततेसाठी आवश्यक तेवढाच ताफा ठेवण्यात आला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शंभूराज देसाई आणि आशिष शेलार यांसारख्या मंत्र्यांनीही आपले परदेश दौरे रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची अंमलबजावणी सरकार म्हणून आम्ही करत आहोत,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *