Headlines

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच सांगितलं भेटीचं नेमकं कारण…

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच सांगितलं भेटीचं नेमकं कारण…
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच सांगितलं भेटीचं नेमकं कारण…

राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी एक महत्त्वाची भेट आज मुंबईत पार पडली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटीचे काही फोटो समोर येताच राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात होते. मात्र, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः माध्यमांना सांगितले की, अनेक दिवसांपासून चहाचा बेत ठरत होता. आज तो पूर्ण झाला. ही फक्त सदिच्छा भेट आहे. यामध्ये राजकारण शोधू नका. मी मंत्री झालो तेव्हापासून भेटायचं ठरत होतं. आम्ही आज मैत्रीपूर्ण भेटलो.

एकूणच, बावनकुळे यांच्या या वक्तव्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *