Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या साखरी धरणातून तालुक्यातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणालगत असलेल्या साखरे गावातील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. साखरे गावातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दैनंदिन…