Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभ्या राहिलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनीही माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचे उमेदवारी अर्ज अद्याप कायम आहेत. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “प्रसाद…