नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, त्या चौथ्या मजल्यात दडलंय मोठं गूढ? नेमकं काय घडतंय?
देशभराची झोप उडवणाऱ्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. गेल्या १९ दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरमध्येच आहे. हे पथक अनेक तपास करत असून मोटगावकर आणि त्याच्याशी संबंधित लोकांची वारंवार चौकशी करताना दिसत आहे. याआधी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ…