Chhatrapati Sambhajinagar | बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 68 वर्षीय महिला डॉक्टरची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट सही करून डॉक्टरांच्या बँक खात्यातून 9 लाख रुपये काढण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं असून फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी…