tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा राजकीय घडामोडींचा खेळ पाहायला मिळाला. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज माघारी घेण्यापूर्वी पक्षांतर्गत आणि आघाडीतील नेत्यांमध्ये जोरदार हालचाली झाल्या. अर्ज मागे घेण्याच्या काही तासांआधीच फोनाफोनी आणि भेटीगाठींचे सत्र रंगले होते. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे…