मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
मुंबईतील चेंबूर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान 10 मुलांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून…