Headlines

Sangram Jagtap | ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक; नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Sangram Jagtap | ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक; नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
Sangram Jagtap | ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक; नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन


अहिल्यानगरमध्ये “ट्रॅव्हल जिहाद” प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य रॅली काढण्यात आली, तसेच नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदू संघटनांचे आणि इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान “लव्ह जिहाद” आणि “लँड जिहाद” नंतर आता “ट्रॅव्हल जिहाद” होत असल्याचा आरोप करण्यात आला.
संग्राम जगताप यांनी आरोप केला की, काही प्रवासी वाहनांमधून हिंदू महिलांशी छेडछाड किंवा गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या आंदोलनामुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *