लाखोंचा खर्च, पण पदरात माती…; आखाती देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कुठे काय स्थिती?
आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धाचा फटका दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचे भीषण परिणाम महाराष्ट्रातील शेती आणि पूरक व्यवसायांवर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गातील अडथळे आणि वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे टरबूज, कांदा आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि उद्योजक मोठ्या आर्थिक…