Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेच्या सचिवालयाकडून याबाबत अधिकृत बुलेटिन जारी करण्यात आले. नव्या कार्यकाळासाठी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर खर्गे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या भूमिकेचे नेतृत्व…